धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक येरमाळा उडाणपुल येथे आले असता पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोलापूर येथील आरोपीकडे चोरलेल्या 4 मोटारसायकली आहेत. यासंदर्भात पथकाने तातडीने सोलापूरला जावून आरोपी व त्यांच्या ताब्यातील चोरीच्या 4 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सैफ इरफान यादगीर रा. सोलापूर हा नविन घरकुल, कुंभारी ता. जि. सोलापूर हा त्याचे राहते घराजवळ गल्लीत आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन पथकाने त्या ठिकाणी जावून त्यास  ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सैफ इरफान यादगीर रा. सोलापूर हा नविन घरकुल, कुंभारी ता. जि. सोलापूर असे सागिंतले. पथकाने नमुद गुन्ह्या संबंधाने त्याच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मी धाराशिव येथुन 03 व धाराशिव शहरच्या पुढचे गावातुन 01 व अंबाजोगाई येथुन 01 अशा एकुण 05 मोटरसायकली चोरलेल्या आहेत असे सांगितले.  त्यावरुन पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, अंबजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील 04 मोटरसायकल एकुण 1 लाख 34 हजार रूपये किंमतीच्या जप्त केल्या. 

जिल्हा  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक  गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ काझी, पोह काझी, पठाण, औताडे, पठाण, चालक भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.


 
Top