ढोकी (प्रतिनिधी)- “विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूख हरली “  असे विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेला शाळकरी बालवारकरी यांची ढोकी  राजेश नगर जि. प. प्राथमिक शाळेच्या वतीने मंगळवारी आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी काढण्यात आली.

इतर दिवशी  शालेय पोशाखात असलेली मुलं -मुली आज चक्क वारकरी वेशभूषा करून रस्त्यावर आवतरले पांढरे कपडे, डोक्यावर टोपी, हातात टाळ तर मुलींनी नऊवारी साडी, केसात गजरा, आणि डोक्यावर तुळशी वृदावन घेऊन वारकरी पोशाखात परिसरातून या बाल वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त टाळाच्या गजरात, मुखी हरीनामाचा जयघोष करत राजेश नगर, समता नगर, मुख्य रस्त्यावरून सदर दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विठ्ठलच्या भूमिकेत इशानी लोखंडे तर रखुमाई म्हणून जानवी लोखंडे हिने वेशभूषा केली होती. तर डोक्यावर विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती घेऊन काव्या धावारे, विणेकरी म्हणून प्रथमेश जावळे तर तुळशी वृदावन घेऊन प्राची माळी सहभागी झाली होती. या बाल वारकऱ्यांच्या दिंडी मार्गात दारोदारी महिलांनी या वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांना साखर भरवली. या दिंडीचे नियोजन मुख्याध्यपिका  पठाण, आर. डी. गायकवाड, सुनीता मस्कर यांनी केले. तर यांची वेशभूषा उत्कृष्ट कलाकार शिक्षक प्रताप धावारे यांनी केली. या वेळी नयन लोखंडे, शीतल धावारे, स्नेहल कदम यांनी सहकार्य केले. या बाल वारकरी दिंडीत पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

 
Top