जळकोट (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवाशी असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल ( हवालदार ) भरत भगवानराव पाठक हे नियत वयोमानानुसार तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन येथून दिनांक 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक जोशी, पोलीस उपनिरीक्षक बारकुल,  पोलीस हवालदार मुळे आदी अधिकारी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त नळदुर्ग पोलीस स्टेशनच्यावतीने ठाणेप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक असलेले मात्र नुकतेच पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेले स्वप्निल लोखंडे यांच्या हस्ते त्यांचा दिनांक 05 जून 2024 रोजी सायंकाळी 04:00 वाजता सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. 

भरत पाठक पोलीस स्टेशनच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे. तेथून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले होते. भरत पाठक यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या संरक्षण दलात सेवा बजावली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याप्रसंगी सौभाग्यवती मंगलवहिनी भरत पाठक, नळदुर्ग पोलीस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक आटोळे, पोलीस हवालदार शिंदे, कांबळे, पोलीस नाईक वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल जमादार, माळी, मोरे, महिला पोलीस गुंड मॅडम, चौधरी मॅडम, तांबोळी मॅडम आदी अधिकारी, कर्मचारी तसेच जळकोट येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेचे वसतीगृह अधीक्षक तथा बंधू बालाजी पाठक, कु. श्रावणी राजकुमार माने आदी उपस्थित होते.


 
Top