परंडा (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण संघर्ष योा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.10 जुलै रोजी धाराशिव शहरात मराठा समाज शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी परंडा तालुक्यातील हजारो मराठा बांधव जाणार असून यासाठी गावा गावात जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी शहरांसह गावोगावी सकल मराठा समाजाच्या बैठका, रॅली काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व वाहनांचा ताफा रॅली दिवशी सकाळी 8 वाजता वारदवाडी फाटा येथे एकत्र येणार असून तेथून धाराशिवकडे मार्गस्थ होणार आहे. 

या बैठकीस माजी आमदार राहूल मोटे, जि. प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.माजी सदस्य नवनाथ जगताप, शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी, सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

 
Top