तुळजापूर  (प्रतिनिधी)- येथील  सर्वाधिक वर्दळीचे  तहसिल व नगरपरिषद कार्यालयातील वरचे मजले चारशे मिलीमीटर झालेल्या पावसात गळु लागले आहेत. त्यामुळे तहसिल कार्यालयांच्या बांधकामांचा दर्जा बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात काही निजामकालीन शासकिय कार्यालय इमारती आजही वापरत आहेत. माञ तहसील कार्यालयाची निजामकालीन इमारत पाडून नवीन बांधकाम केले. सध्या पावसाळ्यात वरच्या मजल्यावर असणाऱ्या तहसिलदार कार्यालायाच्या प्रवेशध्दार समोरीत स्लँब छत गळु लागला आहे.

नगरपरिषद कार्यालयातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोल्या गळत असुन स्लँबचा खालचा प्लास्टर केलेला थर खाली पडल्याने आतील स्टील सळई स्पष्ट पणे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन शासकिय कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिक भितीच्या छायेत काम उरकुन घेत आहे. एकदंरीत या दोन सर्वाधिक वर्दळीचा कार्यालयांच्या या अवस्थेमुळे नागरिकांमधुन सदरील कार्यालयांचे दुरुस्ती करुन कार्यालयाचे छत मजबुत करण्याची मागणी होत आहे.

 
Top