धाराशिव (प्रतिनिधी)- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्यात 1 लाख उद्योगपती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. तर धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 1 हजार उद्योगपती निर्माण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु राष्ट्रीकृत बँका 20 ते 30 टक्केच फक्त सहकार्य करतात. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नरेंद्र पाटील गुरूवार दि. 4 जुलै रोजी धाराशिव शहरात आले होते. त्यांनी बँकेचे अधिकारी, जिल्हा प्रशासन व महामंडळाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालया झालेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाने सहा महिन्यापासून आरक्षणाबाबत आंदोलन सुरू केले आहे. या अगोदरच महायुती सरकारने मराठा समाजासाठी भरीव कार्य करण्यासाठी महामंडळामार्फत काम चालू आहेत आहे. महामंडळाचे राज्यात 94 हजार 528 लाभार्थी आहेत. त्यांना 7 हजार 539 कोटी रूपयाचे कर्ज बँकेने वितरीत केले आहेत. महामंडळाने आतापर्यंत बँकेचे व्याज 788 कोटी रूपये लाभार्थ्यांना परत केले आहेत. राज्यात एकूण 86 हजार 274 महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात 4 हजार 153 बँक कर्ज लाभार्थी संख्या असून, बँकेने त्यांना 318 कोटीचे कर्ज मंजूर केले आहे. महामंडळाने लाभार्थ्यांना बँकेचे भरलेले व्याज परताव्याची 37 कोटी रूपये परत केले आहेत. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे 2018 साली देवेंद्र फडणवीस यांनी पुर्नरचना केली. त्यानंतर महामंडळाचे लाभार्थी वाढले आहेत. नाहीतर काँग्रेसच्या काळात फक्त 15 हजार लाभार्थी होते. पण आमच्या काळात 94 हजार 528 लाभार्थी निर्माण झाले आहेत. असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे विभागीय अधिकारी प्रविण पाटील, जिल्हा समन्वयक अर्जुन बारंगुळे आदी उपस्थित होते.

 
Top