धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयातील विद्युत वितरण प्रणालीमधील सर्व प्रस्तावित कामाचा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आढावा घेऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार ओमराजे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे आर.डी.एस.एस. योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार ओमराजे म्हणाले की, सुधारीत विद्युत वितरण प्रणाली अंतर्गत धाराशिव जिल्हयाकरीता नविन 33/11 के.व्ही.ए. उपकेंद्र (सबस्टेशन) मंजुर करण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत वाडीवस्तीकरीता सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी नविन ट्रान्सफार्मर मंजुर करण्यात आले आहेत. लघु विद्युत वाहिणी तारा बदलणे तसेच 11 के.व्ही.ए.चे विद्युत वाहक तारा बदलणे, 33 के.व्ही.ए. तारा बदलण्याची कामे पुर्ण झाली आहेत. 11 के.व्ही.ए.नविन लाईन टाकणे, 33 के.व्ही.ए. नविन लाईन टाकणे याचबरोबर फिडर सेफरेशन, कॅपॅसिटर बँका, नविन ट्रान्सफार्मर, क्षमतावाढ, अतिरिक्त ट्रान्सफार्मर, पावर ट्रान्सफार्मर बसवले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणकंपनीचे अभियंता आवळेकर यांनी दिली.
सुधारित विद्युत वितरण प्रणाली अंतर्गत संथ गतीने सुरु असलेली कामे जलद गतीने व वेळेत पुर्ण करण्याच्या सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अधिकारी व संबंधीत ठेकेदार कंपनीच्या यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, यांच्यासह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री. आवळेकर, कार्यकारी अभियंता गुजर, कार्यकारी अभियंता कुलकर्णी मॅडम, अशोक बिल्डकॉन नाशिक व नागार्जुन कंन्ट्रक्शन कंपनीचे प्रतीनिधी व यांच्यासह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे इतर अधिकारी उपस्थीत होते.