तुळजापूर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी निमित्ताने तिर्थक्षेञ पंढरपूरला आषाढी वारी निमित्ताने गेलेला वारकरी श्रीविठ्ठलरुकमीणी चरणी वारी सेवा अर्पण करताच व्दादशी दिनी गुरुवार दि. 18 जुलै रोजी दुपार नंतर तिर्थक्षेञ तुळजापूरला श्री तुळजाभवानी दर्शनार्थ दाखल झाल्याने वारकरी भाविकांनी गुरुवार सांयकाळी मंदीर फुलुन गेले होते.
सुमारे पंचवीस हजार वारकऱ्यांनी श्रीतुळजाभवानी दर्शन घेतले. गुरुवार सांयकाळ पासुन ट्रक टँम्पो लक्झरी बसेस जीप चारचाकी गाड्यांसह भाविक तिर्थक्षेञ तुळजापूर येथे दाखल झाल्याने वाहनांनी वाहनतळ भरुन गेले होते. गाडीतुन उतरताच वारकरी थेट मंदीरात जावुन दर्शन घेतल्यानंतर लगेच गावी परतीच्या प्रवासाला जात होते. या वारकरी भाविकांनी कुंभार गल्ली मंदीर परिसर भाविकांनी फुलुन गेला होता.