धाराशिव (प्रतिनिधी)-धारासुर मर्दिनी महिला फेडरेशनचा 20 वा वर्धापन दिन जंगम मठ ,नेहरू चौक येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात अंताक्षरी, शीघ्र नाटिका ,सामान्य ज्ञान चाचणी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शीघ्र नाटिका मधून मेनोपोज, घर संस्कार,12वी नंतर ?,टाईम मॅनेज मेंट, पर्यावरण असे विषय ऐनवेळी देऊन आम्ही सर्वांना घेऊन सामाजिक उपक्रमातून ही आनंद साजरा करू शकतो हे दाखवत महिलांच्या सुप्त गुणांना संधी दिली. महिलांनीही आपापली चुणूक दाखवली. सामान्य ज्ञानातही आम्ही गृहिणी असलो तरी कमी नाही हे ही या महिलांनी दाखवून दिले.           अंताक्षरीचा ही आनंद ही महिलानी एकमेकीच्या सुरात सूर मिसळून घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. कौशिकी राजगुरू, डॉ. श्रद्धा मुळे उपस्थित होत्या. सर्व स्पर्धाचे परीक्षक म्हणून शैला कुलकर्णी व शालू मोले यांनी परीक्षण केले.बक्षीसांचे नियोजन ट्रॉफी व गुलाबांची रोपे अनुक्रमे रेखाताई ढगे व मनीषा गोवर्धन, नीता कठारे यांनी केले.


 
Top