भूम (प्रतिनिधी)-राज्यातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादीचे सरकार हे योजना राबवणार आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे सरकार आहे, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबवलेल्या योजना घरापर्यंत पोहोचवण्याचं कष्ट घ्याव अस आवाहन भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक ॲड नितीन भोसले यांनी भूम येथील बैठकीत बोलताना केले.  यावेळी नवोद्योजक सौ . अश्विनी साठे यांचा लाभार्थी म्हणून सत्कार केला.

बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात भूम तालुक्यातील पदाधिकारी - कार्यकर्ते - समर्थकांची बैठक घेण्यात आली आहे.

या बैठकीत राज्यातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी नवतरुण,  बेरोजगार, बळीराजासाठी ज्या काही नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. त्या योजनेची विस्तृत माहिती देऊन प्रत्येक योजना लाभधारकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी कष्ट घ्याव व योजनेचे लाभ मिळवून देण्यात यावे,  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवावी, यासाठी ठिकठिकाणी कॅम्प उभारावे अशी आवाहन पक्षाचे निरीक्षक ॲड नितीन भोसले यांनी बैठकीत बोलताना केले.

बैठकी दरम्यान जिल्हा उद्योग केंद्र व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मंडप डेकोरेशन व्यवसायसाठी पक्षाच्या सहकार्याने सौ अश्विनी साठे यांना पाच लाख रुपयाचे आर्थिक बळ मिळाले,  यातून त्यांनी आणखी भर घालून जवळपास नऊ लाख रुपयाचा चांगला व्यवसाय सुरू केला,  याचे कौतुक म्हणून त्यांचा सर्वांनी विशेष सत्कार केला सत्कार केला.

यावेळी भूम, परांडा, वाशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, अ.जा.मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अल्पसंख्याक ता.अध्यक्ष अब्दुल लहाजी शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका चिटणीस संतोष औताडे,  समाधान अंधारे, महिला जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे, महिला ता.अध्यक्ष स्वातीताई तनपुरे, आश्विनीताई साठे, चंद्रकांत मासाळ, बाबुराव खरात, चंद्रकांत गवळी, ॲड संजय शाळू, शरद चोरमले, लक्ष्मण भोरे, रघुनाथ वाघमोडे, अलि अद्रूस,  युवा तालुकाध्यक्ष गणेश भोगील, भाऊसाहेब कुटे, सुजित वेदपाठक,  दिनेश पौळ, अमित पाटील  आदि उपस्थित होते.

 
Top