सोलापूर (प्रतिनिधी)-25 व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ मध्य रेल्वेचे गिर्यारोहक  द्रास - कारगिल सेक्टरमधील माउंट टोलोलिंग आणि पॉइंट 5140 मीटर शिखर सर करणार आहे. मध्य रेल्वेचे, महाव्यवस्थापक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले

श्री राम करन यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी द्रास - कारगिल सेक्टरमधील माउंट टोलोलिंग आणि पॉइंट 5140 मीटर शिखरांवर मोहिमेसाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या संघाचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या शूर सैनिकांना आदरांजली म्हणून संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या मोहिमेचा हा संघ भाग आहे. कारगिल विजय दिवस, दरवर्षी दि. 26 जुलै रोजी साजरा केला जातो, तो दिवस जेव्हा भारतीय सैनिकांनी 1999 मध्ये शत्रूने ताब्यात घेतलेल्या उंच पर्वताचा  पुन्हा कब्जा केला. हा दिवस त्यांच्या धैर्याची आणि त्यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.

सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) च्या नेतृत्वाखाली सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (सीआरएसए) च्या सहकार्याने मध्य रेल्वेच्या 22 रेल्वे कर्मचाऱ्यांचा संघ जो माउंट टोलोलिंग आणि पॉइंट 5140 मीटर चढून हा आव्हानात्मक प्रवास करणार आहे. 

सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या संघाचा राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी मोहिमा हाती घेण्याचा समृद्ध इतिहास आहे. भूतकाळात, संघातील सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2022 मध्ये श्री हेमंत आणि श्री संदीप यांनी 7135 मीटर उंच माउंट नुन शिखरावर यशस्वी चढाई केली होती तसेच 2023 मध्ये, या जोडीने माउंट एव्हरेस्टवर 8000 मीटर उंची गाठली. अशी कामगिरी करणारे ते पहिले रेल्वे कर्मचारी ठरले. त्यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी बोलताना, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव म्हणाले, “मध्य रेल्वे शूर सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम करते आणि मोहीम पथकाला शुभेच्छा देते. तसेच आम्हाला विश्वास आहे की, त्यांनी द्रासमधील माउंट टोलोलिंग व पॉइंट 5140 मीटरचा प्रवास केला आहे त्यामुळे कारगिल सेक्टर यशस्वी होईल. अशा मोहिमा संघभावना, दृढनिश्चय, नेतृत्वगुण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महान भारतीय राष्ट्राबद्दल आपुलकीची भावना निर्माण करतात.“ 

श्री प्रभात रंजन, अपर महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे; श्री एम एस उप्पल, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आणि अध्यक्ष सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन;   श्री रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग;  मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, टीम सीआरएएससी आणि सीआरएसए चे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

 
Top