कळंब (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक चांगली योजना कार्यान्वित केली आहे या योजनेची माहिती घरोघरी पोहोचवून त्याचे फायदे तोटे सांगण्यासाठी व महिलांची फरपट थांबवण्यासाठी कळंब नगर परिषदेने एक चांगला उपक्रम हाती घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म सध्या गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .  त्यातच नगर परिषदे चे  मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राजेश तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादी निहाय प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार यादीनुसार हे फॉर्म  गोळा करण्याचे काम नगर परिषदेचे कर्मचारी करत आहेत . 

कळंब शहरा अंतर्गत जवळपास 25 हजार महिलांची संख्या असून यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी नगरपरिषद ,तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाण्याची आता गरज नाही कारण नगर परिषदेचे कर्मचारी ही मतदार यादी निहाय व वार्ड नुसार हे फॉर्म गोळा करण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले असून हे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती तापडिया यांनी दिली आहे . त्यामुळे नगर परिषदेच्या कामाचा वेळीही वाचणार आहे व महिलांची होणारी फरपट व त्यांना लागणारे कागदपत्र हे आता घरबसल्या माहिती होणार आहे या उपक्रमामुळे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक यांचे महिला वर्गातून कौतुक केले जात आहे . त्यामुळे कळंब  शहरातील सर्व महिलावर्गांनी कळंब नगर परिषदेच्या घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्व आपली माहिती देऊन व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरून देऊन सहकार्य करावे असे आव्हाने नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक राजेश तापडिया यांनी नागरिकांना केले आहे.

 
Top