धाराशिव (प्रतिनिधी)-सकल धनगर समाजाच्यावतीने एस. टी. आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या चार युवकांस धाराशिव वकील संघाने पाठिंबा दिला आहे. वकील संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना धनगर समाजाला एस. टी. आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
धनगर समाजास एस. टी. आरक्षण प्रमाणपत्र देवून त्यांची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजातील चार युवक आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दरम्यान आज धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडख यांच्यावतीने वकिलांनी उपोषणस्थळी येवून पाठिंबा दर्शविला.