धाराशिव (प्रतिनिधी)- दि.18 जुलै रोजी 2024 रोजी सकाळी 6 वाजता 30 वर्षीय महिला व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडली असताना गावातीलच एका तरूणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने महिलेला उसाच्या शेतात ओढून नेवून बलात्कार केला आणि घटना कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. 

पीडित महिलेने 20 जुलै रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 354, 354 अ, 323, 506 आणि 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3 (2) (व्ही), 3 (1) (आर) (एस), 3 (1) (डब्ल्यु) (i) ( ii) अंतर्गतही आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.


 
Top