कळंब (प्रतिनिधी)-आषाढी वारीसाठी निघालेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती (विदर्भ) येथील रुक्मिणी माता पालखीचे कळंब शहरात दिनांक 6 जुलै रोजी आगमन झाले. मिरवणुकीने दिंडी कळंब येथील पुनर्वसन सावरगाव हनुमान मंदिर येथे पोहोचली असता कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे उपसभापती व प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीधर भवर, मनोहर भाकरे, हभप. महादेव महाराज अडसूळ, गोपीचंद फावडे, सुरेश भाकरे,शैलेश भाकरे यांनी पालखीचे दर्शन घेतले व सांज आरती केली. या पायदळ दिंडीमध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर संस्थांचे सचिव व प्रमुख सदानंद साधू महाराज, विश्वस्त सुरेश चव्हाण, दिंडी चालक हभप पंकज महाराज मोहले यांच्यासह 200 वारकरी सहभागी आहेत.

श्री क्षेत्र कौंडण्यपूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती रुक्मिणी माता माहेर येथून पालखीचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे दिनांक 11 जून रोजी प्रस्थान झाले. 750 की. मी. चा पायदळ प्रवास करू ही पालखी दिनांक 14  जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होत आहे.  पालखीचा कळंब येथील 26 वा मुक्काम आहे. महाराष्ट्रात आषाढी वारीची शेकडो वर्षाची परंपरा असून श्रीक्षेत्र कौंडण्यपूर संस्थान  पालखी 1594  पासून पायदळ आषाढीवारी करीत असून प्रथम मानाची पायदळ पालखी म्हणून मानाचेस्थान आहे. कळंब मुक्कामी पालखीतील वारकऱ्यासाठी महाप्रसाद व रात्रीची भोजनाची व्यवस्था मनोहर भाकरे कुटुंबाकडे तर सकाळचा चहा पाणी  विलास मुळीक तर नाष्टा बाळासाहेब जाधवर यांच्या परिवाराच्या वतीने दही धपाटे स्वादिष्ट असा नाष्टा  देण्यात  आली.  तर दि. 7 जुलै रोजीचे दुपारचे भोजन अँड. पी. आर. सोनटके यांनी देऊन पालखीचे पंढरपूर कडे प्रास्थान झाले. यावेळी कंळब तालूका मराठी  पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, हनुमान मंदीर संस्थानचे रविंद्र काळे, माधव सिंग राजपूत, सतिश टोणगे, शाम घाडगे, राजेश शेळवणे, विजय पुरी, ज्ञानेश्वर गिरी,औदुबर पुरी, गोपीनाथ फावडे, ओंकार भाकरे, श्रीधर भाकरे, बाळू भाकरे, प्रशांत भाकरे, विठ्ठल फावडे, सुरेश भाकरे, शिवाजी भाकरे, विठल काटे  सह आदीनी परिश्रम घेतले.


या पालखीचे निरीक्षण व सुख सुविधा उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्यासाठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक गोपाळ तापडिया यांनी नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांना सुविधेबाबत यावेळी सूचना केल्या. तर उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने वारकऱ्यांची 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तपासणी करून गोळ्या औषध उपचार देण्यात आले.

 
Top