धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील अनसुर्डा येथील डॉ.आकाश अरुणराव माने यांनी रशिया देशातील प्रिव्होल्झस्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीतून एम.बी.बी.एस. पदवी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

एम.बी. बी. एस. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गावी परत आले असता भोलेसिंग गिरासे, सुरज काझी, भाऊसाहेब मनगिरे, जीवनराव देशमुख, सचिन शित्रे, उद्धव अवचार यांनी डॉ.आकाश माने यांचा सत्कार केला. याप्रसंगी अनसुर्डा गावचे माजी सरपंच अरुणराव माने तसेच माने कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top