धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या शालेय सप्ताह हा दि . 22 ते 28जुलै दरम्यान साजरा करण्यात येत असून यातील दिवस दुसरा या उपक्रमांतर्गत प्रशालेमध्ये इ.8 वीच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिकपणे निपुण प्रतिज्ञचे वाचन करण्यात आले व या प्रतिज्ञेचे महत्त्व प्राचार्यांनी उदाहरणासह विशद केले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक सुनील कोरडे, आर.बी. जाधव तसेच शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.