ताज्या घडामोडी



धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लाचखोरी प्रकरणी एसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आरोग्य केंद्रातील डॉ. नितीन कालीदास गुंड यास तीन हजार रूपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पदावर एक इसम कार्यरत आहे. त्यांना दोन दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल न पाठविण्यासाठी डॉ. गुंड यांनी तीन हजार रूपयांची लाच मागितली होती. एसीबी पथकाने लाच मागण्याच्या पडताळणी दरम्यान 24 जुलै रोजी डॉ. गुंड यांनी पंचाच्या उपस्थितीत लाचेची रक्कमव स्विकारली. त्यामुळे डॉ. गुंड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार कंत्राटी कर्मचाऱ्याचे पगार, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याचे अधिकारी डॉ. गुंड यांना आहेत. या प्रकरणी एसीबीचे संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर, सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विकास राठोड, पोलिस निरीक्षक धाराशिव,  मुकुंद आघाव, अप्पर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजी नगर, सापळा पथक पोलीस अंमलदार इप्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांनी कारवाई केली. 

 
Top