धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या निमित्ताने शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम घेण्यात आले.यात विद्यार्थ्यांना क्रीडा दिवस, डिजिटल डे ,शालेय पोषण दिवस ,मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता यासह अध्यापन साहित्य आधारित विविध कौशल्यांचे प्रशिक्षण विविध उपक्रमांद्वारे देण्यात आले.
या शिक्षण सप्ताह निमित्त आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अध्यापन साहित्याचा शैक्षणिक अध्यापनात वापर करून अध्यापन करण्यात आले. यात भाषा गणित विज्ञान या विषयावर आधारित विविध शैक्षणिक साहित्य वापरून शिकवण्यात आले.मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता या दिवशी विद्यार्थ्यांना गणित आणि सामान्य भाषा याविषयी माहिती देण्यात आली. क्रीडा दिनाच्या निमित्ताने बुद्धिबळ, कबड्डी ,संगीत खुर्ची अशा खेळांमधून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसोबत क्रीडाविषयक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी खेळांची आवश्यकता असल्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
डिजिटल डे या दिवशी प्रशालेतील अटल टिंकरिंग लॅब मध्ये विद्यार्थ्यांचा डिजिटल क्लास घेण्यात आला. या माध्यमातून गणितातील विविध अध्यापन कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली, यासोबतच विज्ञान ,भाषा ,इतिहास यासह सर्व विषयांचे डिजिटल क्लास या निमित्ताने घेण्यात आले. शालेय पोषण दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना जंक फूड टाळून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले.
या सर्व उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अध्यापन सोबत विविध कौशल्य विकसित करण्याचेवप्रशिक्षण मिळाले. तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीत शालेय अभ्यासक्रमासोबतच क्रीडा कौशल्य आणि संगणकीय कौशल्य माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासात वापर करण्याची दृष्टी यासह परिसरातील विविध वनस्पतींचा अभ्यास शैक्षणिक साहित्याच्या आधारे अवघड विषय समजून घेण्यासाठीची युक्ती हे ज्ञान मिळाले. आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मनीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक सप्ताह विविध उपक्रमांनी शाळेतील माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचाऱ्यांनी विविध उपक्रम राबवून संपन्न केला.