तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सरहदवर असलेल्या तामलवाडी येथील जयकिसान कृषि केंद्रच्या डाव्या बाजुस असलेल्या पञ्याच्या गोडाऊन मध्ये विनापरवाना खतांच्या साठ्यावर धाड ठाकुन एकुण चारशे बॅग 20 मेट्रीक टन एकुण किंमत 5 लाख 88 हजार रुपये किंमतीचा अनाधिकृत बोगस खतसाठा जप्त करुन संबंधितावर तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुळजापूर तालुक्यात कृषी विभागाने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.
तामलवाडी येथील जयकिसान कृषि केंद्र, याच्या डाव्या बाजुस असलेल्या पञ्याच्या गोडाऊन मध्ये विनापरवाना खताचा साठा करण्यात आला आहे. अशी माहिती मिळताच कृषि अधिकारी घटनास्थळी पोहचल्यानंतर गोडऊनच्या आत डाव्या बाजुच्या शटर मधुन प्रवेश केला. त्यावेळी तेथे पांडूरंग खंडू खारे मँनेजर जयकिसान कृषि केंद्र हे हजर होते. गोडाऊनची झाडाझडती घेऊन सर्व उत्पादनाची माहिती त्यांचेकडून प्राप्त करुन घेतली. सदर गोडाऊन मध्ये उर्वरक किसान गोल्ड फर्टिलाईझर 10:26:26 निदर्शनास आले. त्यानुसार सदर गोडावुनचे मालक महादेव लक्ष्मण चौगुले यांना फोनव्दारे सदर खताच्या परवाना बाबत विचारणा केली असता उर्वरक किसान गोल्ड फर्टिलाईझर 10:26:26 यांना परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार गोडाऊन मध्ये परवाना नसलेले अनाधिकृत खत साठा आढळला.
सदरील कारवाई साहेबराव दिवेकर यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस 10:26:26 400 पोते एकूण रक्कम 5 लाख 88 हजार निदर्शनास आल्यामुळे पोलीस ठाणे तामलवाडी तालुका तुळजापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील गुन्ह्याची फिर्याद प्रवीण पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धाराशिव यांनी दिली. सोबत मोहीम अधिकारी ड्री. ए. गरगडे, तालुका कृषि अधिकारी अवधूत मुळे, पंचायत समिती तुळजापूर कार्यालयाचे कृषी अधिकारी सतीश पिंपरकर होते. याकामी प्रवीण विठ्ठल भोर तंत्र अधिकारी गु नि लातूर यांनी सखोल मार्गदर्शन व नियोजन केले.