कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव नगर महाविद्यालय कळंब ता. कळंब, जि. धाराशिव येथे हिंदी विभागामार्फत हिंदी साहित्याचे प्रसिध्द साहित्यकार प्रेमचंद यांच्या 145 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. अशोक मोहेकर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर दत्ता साकोळे हे उपस्थित होते. 

डॉ. दत्ता साकोळे यांनी प्रेमचंद यांच्या यांचे जीवन व साहित्य याविषयी सविस्तर विचार मांडले तसेच प्रेमचंद यांच्या साहित्यावर चर्चा करण्यात आली यावेळी महाविद्यालयातील प्रा. ईश्वर राठोड, प्रा. नामानंद साठे, प्रा. ताटीपामुल, प्रा. आदाटे, प्रा. पाटील, प्रा. मीनाक्षी जाधव, प्रा. खंडागळे, प्रा. आडे, प्रा. शिंदे, प्रा.  शाहरुख शेख, प्रा. बालासाहेब बाबर, प्रा. मारुती शिंपले तसेच सुजाता तेलंग, प्रांजली शिनगारे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top