तुळजापूर  (प्रतिनिधी)-  95 हजार मराठा उद्योजक घडवले असुन एक मराठा एक लाख म्हणी प्रमाणे एक लाख मराठा उद्योजक  घडविण्याची संकल्पपुर्ती लवकरच करणार असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तुळजापूर येथे केले. गुरुवार दि. 4 जुलै रोजी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात लोक मंगल को-आँप बँक लि.आयोजीत अण्णासाहेब पाटील महामंडळ आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत  कर्जाचा लाभ घेण्यास इच्छुक ग्राहकांचा मराठा उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर रोहन गवळी, रामदास कोळगे, संतोष बोबडे, अँड.  दिपक आलुरे, विवेक सांळुके, रविद्र  पाटील, महेश गवळी, आबा कापसे, प्रशांत अपराध, प्रभाकर मुळे, मिनाताई सोमाजी अदि मान्यवर उपस्थितीत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजने अंतर्गत बँकेमार्फत कर्जपुरवठा केला जातो. कर्जफेड करणाऱ्या लाभार्थीचा सत्कार लोकमंगल फाँऊंडेशन तर्फ सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि महामंडळाने राज्यात महामंडळ माध्यमातून मराठा समाजातील तरुण कुठल्याही पक्षाचा असो तो उद्योजक बनला पाहिजे. या उद्देशाने काम केले. 1980 पासुन मराठा समाजाची हेळसाड झाली. महायुतीने मराठ्यांसाठी भरपूर काम केले. त्यांनाच तुम्ही पाडले याची खंत व्यक्त करुन राजकारणात मराठा समाजाचा दुरुपयोग होता कामा नये याची दक्षता घेण्याचे  आवाहन केले. सध्या मराठा आरक्षण आंदोलन गावातुन मुंबईत पोहचले आहे. मराठा आरक्षणसाठी महायुती मनापासून काम करीत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रीय कृत बँका मराठा समाजाचा पाठीशी उभ्या राहत नाहीत असा आरोप करुन लोकमंगल को-आँप बँक माञ मराठा समाजाचा पाठीशी खंबीरपणे उभे राहुन शंभर उद्योजक निर्माण केल्याबद्दल माजीमंञी आमदार सुभाष देशमुख, लोकमंगल फाउंडेशन अध्यक्ष रोहन देशमुख यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करणार असल्याचे यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना रोहन देशमुख म्हणाले कि, लोकमंगल ने महामंडळ माध्यमातून नउशे बेरोजगार तरुणांना उधोजक बनवले धाराशिव सोलापूर जिल्हयात शंभर कोटी कर्ज वाटप केले. लोकमंगल समुहाने संस्थापक माजीमंञि आ सुभाष देशमुख यांच्या  मार्गदर्शनाखाली  छोट्यांन पासुन मोठ्या पासुन मदतीचा हात दिला आहे. मराठा सह अन्य समाजातील युवक उद्योजक बनवा ही बापुची इच्छा असुन त्यासाठी लोकमंगल कार्य करीत असल्याचे  यावेळी सांगितले.  तुळजापूर तालुक्यात एक लाख लिटर सोयाबीन आँईल मिल, प्रकल्प सुरु केला जात आहे. उद्योग करणाऱ्यांच्या पाठीशी लोकमंगल ठामपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी मोठ्या संखेने मराठा तरुण उपस्थितीत होते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमंगल फाउंडेशन लोकमंगल को-आँपरटीव्ह बँक शाखा तुळजापुरचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top