कळंब (प्रतिनिधी)- हरी नामाचा गजर करत , विठ्ठलाचे अभंग गात पंढरपूरकडे निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजाच्या पालखीचे गुरुवार दि . 4 जुलै रोजी कळंब शहरात आगमन होताच मांजरा नदी तिरावर बीड ,उंस्मानाबाद जिल्हा सरहदीवर प्रथम पोलीस प्रशासनाच्या वतीने कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी सायंकाळी 4 वाजता गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करून पूजन करण्यात आले .तसेच प्रशासनाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक गोपाळ तापडिया यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी , तलाठी व्यंकट लोमटे , नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री वाघमारे , गोविंद रणदिवे यांच्यासह शहरातील नागरिक व्यापारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या पालखीच्या आगमनाने शहराला पंढरीचे रूप आले होते. गुरुवार दि. 4 जुलै रोजी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. सायंकाळी शहरातून ही मिरवणूक निघाली. दरवर्षी शेगांव येथील गजानन महाराजांची दिंडी पंढरपूर कडे जाताना कळंब मध्ये मुक्काम आसतो. शहरात प्रवेश करताना भाविकांनी पालखीचे मांजरा नदी येथे पुलावर स्वागत केले. त्यानंतर ही दिंडी परळी रोड, शिवाजी चौक,होळकर चौक ,नगर परिषद शाळा क्र.1 च्या मैदानात ही मिरवणूक विसर्जित करण्यात आली. श्रीची आरती होऊन बापूराव करंजकर परिवाराच्या वातिने वारकऱ्याना रात्रीच्या भोजना ची व्यवस्था करण्यात आली होती .संत श्रेष्ठ गजानन महाराज संस्थान पालखी सोहळा कळंब शहरात दाखल होतोयच “गण गण गणात बोते“ नाम संकीर्तन घेऊन जीवन पावन करून घ्यावेत तस पाहता कळंब शहरातील भाविक गजानन महाराज पालखीचे वाजत गाजत दरवर्षी स्वागत करतात.
ही दिंडी 13 जून रोजी शेगाव जि. बुलढाणा येथून निघाली होती. आज कळंब शहरातील वाविसवा मुक्काम होता.श्रींचे पालखी सोबत 700 वारकरी मंडळीसह 3 अश्व व 10 वाहने आहेत. वारकऱ्यांकरीता ॲम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यांसह आहे. याव्दारे श्री च्या पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारक-यांकरीता औषधोपचार केल्या जातो. वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे. श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि . 15 जुलै ला पोहचेल. श्रींची पालखीच्या ठिकाणी रात्री कीतनांचा कार्यक्रम झाला. तरी भाविकांनी कीर्तन श्रवणाचा व श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. श्रींचे पायी पालखी सोहळ्याचे हे 55 वे वर्ष आहे.