ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तेरणा युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून ढोकी गावात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशन, न्यू लाईफ इंग्लिश स्कूल, च्या परिसरात मोठया प्रमाणात वाढलेलं गवत (तण ) यावर तणनाशकाची फवारणी करण्यात आली या मुळे वाढलेलं गवत, व घाणीचे साम्राज्य नक्कीच कमी होईल मेघ दादा पाटील यांनी सुरु केलेल्या तेरणा युथ फाउंडेशन हे सर्वच क्षेत्रात जोमाने कार्य करीत असल्याने तेरणा फाउंडेशन व त्यांच्या टीम चे कौतुक केल जात आहे. तसेच राजेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त समिती कडून बसण्यासाठी फायबर खुर्च्या शाळेस भेटस्वरूपात देण्यात आल्या याबद्दल.श्री अंकुश जाधव,सरकारी दवाखान्याचे अधिकारी जाधव साहेब तसेच राजेशनगर शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम यांनी युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते नितीन खंडागळे व त्यांची टीम यांचे धन्यवाद व्यक्त केले मेघ दादा पाटील यांनी केलेली कार्याची चळवळ युथ फाऊंडेशनच्या वतीने वास्तवात कार्य करत आहेत याबद्दल त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी तेरणा युथ फॉउंडेशन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे नितीन खंडागळे, मेघराज सुतार, दिनेश माळी, अंकुश जाधव,राजपाल लोखंडे,अमोल लोखंडे,अमर शिंदे,माऊली रसाळ,ओम शेंडगे,बाबा कांबळे, अजय खंडागळे,अजय रसाळ,नयन लोखंडे, अजित रसाळ, आदित्य दनाने, हंसराज साठे, स्वप्नील शेंडगे आदी कार्यकर्ते पदाधीकारी उपस्थित होते.