ढोकी (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्रातील शाळांमध्ये आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगाव ता धाराशिव या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला.
दिनांक 22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, 23 जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साहित्य दिवस, 24 जुलै रोजी क्रीडा दिवस, 25 जुलै सांस्कृतिक दिवस, 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, 27 जुलै रोजी पर्यावरणातील बदल व गंभीर समस्या याबाबत जागरूकता निर्माण करणे यासंबंधीचे सर्व उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगाव या शाळेमध्ये तेरणानगर बीटच्या विस्ताराधिकारी श्रीमती जोशी के. ए. यांच्या मार्गदर्शनानुसार व शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद अनपट यांच्या कल्पकतेने व तडवळे केंद्राचे केंद्रप्रमुख जगदीश जाकते यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती मध्ये उत्साहाने साजरे करण्यात आले. यामध्ये शाळेतील उपक्रमशील व उत्साही सर्व शिक्षक सहभागी झाले यामध्ये बाहुबली नवले,शिवदास चौगुले, दत्तात्रय पडवळ, सुलभकुमार भगत, नवनाथ बचाटे,अमोल वैद्य, नामदेव डुकरे या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्तकलागुणांचे दर्शन घडवले. या शिक्षण सप्ताहामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.