तुळजापूर (प्रतिनिधी)- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या मास कम्युनिकेशन अँड जर्नलिजम पदविका परीक्षेत पत्रकार दादासाहेब काडगावकर यांनी 83.25 गुण घेत यश मिळवत यश प्राप्त केले. मे-जून 2024 मध्ये पद्मश्री सुमतीबाई हायस्कूल अँड ज्यु जनसंज्ञान व आधुनिक प्रसारमाध्यमे, पत्रकार कार्य, जबाबदारी बातमीची विविध क्षेत्रे, संपादक कार्य या अभ्यासक्रमात ही परीक्षा घेण्यात आली होती. अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करून पत्रकार दादासाहेब काडगावकर यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या यशाबद्दल राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरासह मित्रपरिवार, नातेवाईकांकडून. कौतुक होत आहे.

 
Top