धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस एक ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी देवीजींना महाआरती व अभिषेक ठीक 8 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक धाराशिव येथे जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण, सकाळी 10 वाजता हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे दर्गाह येथे चादर चढवणे, सकाळी 10:30 वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, 11:30 वाजता वृक्ष वाटप वृक्षारोपण, 12:30 वाजता श्री रामलिंग देवस्थान येडशी महाअभिषेक, 1:00 वाजता खेड तालुका धाराशिव येथे भव्य रक्तदान शिबिर सायंकाळी 5:00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.  तरी जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 
Top