धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील जनाई मंगल कार्यालय परिसर, ईरा इंटरनँशनल स्कुल, स्काऊट गाईड परिसर, तुळजाभवानी स्टेडियम, बोंबले हनुमान व हातलादेवी परिसर इ. ठिकाणी कडूलिंब, आवळा, बेहडा व करंज अशा वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच पिंपळ, वड,चिंच, यांच्यासह अश्वगंधा, कोरफड, गुळवेल, भूमी आवळा, तुळस अशी वनौषधींची रोपटे लावण्यात आली.  

जनाई मंगल कार्यालय परिसरातील नागरिकांना वृक्षाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी स्वत:च्या खर्चाने जाळी लावून  संगोपन  करण्याची हमी दिली. निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्यां भावनेतून प्रत्यूेक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याणसाठी आपापल्याग क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन यावेळी रुपामाता परिवार व पतंजली योग समिती धाराशिव च्या वतीने करण्यात आले.

या वृक्ष लागवड मोहीमेत रुपामाता परिवाराचे संस्थापक अँड. व्यंकटरावजी गुंड, पतंजली योग समिती धाराशिव जिल्हा प्रभारी श्री.राम ढेरे, डॉ. रविजीत अशोक देडे,श्री. अनुरथ नागटिळक, श्री. रवींद्र कुदळे,श्री.अशोक रणसुभे, स्वीमर ग्रुप धाराशिवचे ॲड. शरद गुंड, गणेश घोडके गजानन पाटील,राजेंद्र कापसे, श्री.बालाजी बोंदर,  श्री. ज्ञानेश्वर काळबंडे, श्री. शिंदे, श्री.विजय बागल,श्री. गुणवंत काकडे ,श्री. बनसोडे, श्री. जगताप, श्री. बलभीम कांबळे, श्री.अंबेकर, श्री. रामदास गौड, श्री.भारत थडवे. इ. वृक्षसंवर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

 
Top