धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थ्यांनी 'सी' प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकाल लावत घवघवीत यश संपादन केले आहे. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील दहा कॅडेट्स सी प्रमाणपत्र परीक्षेसाठी बसलेले होते. त्यापैकी सर्व कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी एनसीसी कॅडेट्स आणि लेफ्टनंट डॉक्टर केशव क्षीरसागर यांचे अभिनंदन केले आहे. व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top