तुळजापूर (प्रतिनिधी)- गुरुपोर्णिमा निमित्ताने श्रीतुळजाभवानी महंत तुकोजीबुवा, हमरोजी, वाकोजी बुवांचा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने फेटा बांधुन हार घालुन श्रीफळ देवुन मंदीर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार सोमनाथ माळी यांनी सन्मान केला. यावेळी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, विश्वास परमेश्वर, गणेश गायकवाड, दिपक चोपदार, संदीप वाघे, सचिन सांळुके उपस्थितीत होते.