ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील निसर्गरम्य दत्त टेकडीवर असलेल्या एका पत्र्याच्या शेड मधील बांधकाम साहित्याची अज्ञात चोरट्यानी चोरी केली होत.  ढोकी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत अवघ्या दोन तासात चोरट्याच्या मुसक्या आवळत जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांकडून पोलिसांचा सत्कार 

करण्यात आला.

या बाबत माहिती अशी की लातूर -बार्शी मार्गा लगत असलेल्या निसर्गरम्य दत्त टेकडी असून त्या ठिकाणी दत्तात्रय मंदिर व मुस्लिम धर्मियांचा ईदगाह मैदान आहे. या ठिकाणी बांधकाम चालू असून येथील एका पत्र्याच्या शेडचे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून मध्ये ठेवलेल 15 लोखंडी बार, स्टीलचे 16 बार, खोऱ्या,पाईप लाईनचे टी, बायडिंग वायरचे बंडल असे 28 हजार रूपये किमतीचे साहित्य बुधवार दि. 3 जुलै  सायंकाळी 5:30 दरम्यान चोरून नेहल्याची फिर्याद मंदिर समितीचे राजपाल गुणवंतराव देशमुख यांनी ढोकी पोलिसात दिली.  तात्काळ पीएसआय संतोष तिगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तिबोले, सातपुते, पोना श्रीमंत क्षीरसागर यांनी तपासाची गतिमान चक्रे फिरवत धाराशिवकडे जाणाऱ्या मार्गांवर आरोपीना पकडण्यासाठी सापळा रचून अवघ्या दोनच तासात आरोपी प्रकाश छगन काळे वय 39 रा. धाराशिव व त्याच्या दोन महिला साथीदार यांना मुद्देमाल व वाहतुकीसाठी वापरलेला माल वाहतूक रिक्षा सह अटक करून एकूण 3 लाख 78 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या वेळी पीएसआय संतोष तिगोटे यांनी सांगितले की, ढोकी परिसरात मागील काही दिवसा पूर्वी झालेल्या चोऱ्या मध्ये या आरोपीचा सहभाग असल्याची शक्यता असून त्या बाबत आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने पुढील तपास करण्यात येईल असे सांगितले.

 
Top