धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागात 50 टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत लाखो पदाचा अनुशेष शिल्लक असताना यापदाची भरती करण्याऐवजी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून साठ वर्षे वाढविण्याचा निर्णय घेऊ नये. अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्टट्राईब कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा धाराशिव यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे नोकरीच्या शोधात वयबाद रेषेजवळ असलेल्या शिक्षित,उच्चशिक्षित,प्रशिक्षित, बेरोजगारांना रोजगाराची संधी नाकारल्यासारखे आहे. एल एल बी इंजीनियरिंग कोर्स पूर्ण केलेले उच्चशिक्षित प्रशिक्षित बेरोजगार चतुर्थश्रेणीच्या पट्टेदार, चपराशी, कोतवाल यासारख्या एका पदासाठी हजारो बेरोजगार अर्ज करतात. हेच नव्हे काही ठिकाणी नोकऱ्या करताहेत. नुकतेच पोलीस शिपाई वाहनचालकांच्या 143 जागांसाठी आठ हजार अर्ज आल्याचे समजते. सेवानिवृत्ती जवळ आलेले अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मानधनावर, वेतनश्रेणीत, उच्चशिक्षित, प्रशिक्षित सक्षम सेवा देऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने 58 वरून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा घेतलेला. निर्णय तात्काळ रद्द करावा.सेवानिवृत्तीच्या जवळ आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अपत्ये उच्चशिक्षित प्रशिक्षित बेरोजगार आहेत. तेव्हा सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्यापेक्षा उपाशी असलेल्या बेरोजगारांना केंद्रस्थानी मानुन धोरण आखण्याचे नियोजन करावे. यावेळी निवेदनावर राज्य अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे, धाराशिव जिल्हाध्यक्ष बापू शिंदे, जिल्हा सचिव सुधीर जाधवर, जिल्हा उपाध्यक्ष संजय धावारे,ज्येष्ठ उपाध्यक्ष विठ्ठल कवाळे,आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

 
Top