तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ जीवन पवार यांनी वरील प्रतिपादन केले.पुढे ते म्हणाले की, भारतीय स्वराज्याचे लोकमान्य टिळक हे पहिले प्रबळ पुरस्कर्ते होय.भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती.स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे त्यांचे ब्रिद समजून घेणे गरजेचे आहे.1905 ते 1907 च्या स्वदेशी चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळवादी आणि जहालवादी अशी विभागणी झाली.लाला लजपतराय,बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती, म्हणूनच या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.आज खरा राष्ट्रवाद काय असतो हे जाणून घेण्यासाठी तरुणांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांची जोपासना करण्याचा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.सदर प्रसंगी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मंत्री आर आडे यांनी केले तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.


 
Top