धाराशिव (प्रतिनिधी)-आयसीआयसीआय फाउंडेशन आणि ग्रामपंचायत समुद्रवाणी यांच्या सयुक्त विद्यमाने व जिल्हा परिषद शाळा यांच्या प्रयत्नातून  समुद्रवाणी व परिसरातील तरुण,  बेरोजगारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि.5) करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविकात विकास कांबळे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश विशद केला. गेली दहा वर्षे शहरी भागात असलेल्या प्रशिक्षण केंद्रांना आता ग्रामीण भागात स्थापन करून खेड्यापाड्यातील तरुणांपर्यंत व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन आयसीआयसीआय फाउंडेशन कार्य करत असल्याचे  त्यांनी संगितले.

जिल्हा प्रकल्प अधिकारी चेतन पाटोळे यांनी व्यावसायिक शिक्षणासोबतच दत्तक खेड्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दीष्ट फाउंडेश चे असल्याचे संगितले.सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष हनमंते यांनी गावातील तरुणांसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत नेहमीच साथ देण्याची ग्वाही दिली.

शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब मगर यांनी प्रशिक्षणार्थयाना व्यवसाय शिक्षणाचे महत्व पटवून देताना आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहन केले.

केंद्र प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी नवीन शैक्षणिक धोरनाप्रमाणे व्यवसाय शिक्षणाला महत्व असल्याचे संगितले. तसेच अशा उपक्रमांना आपली शाळा नेहमीच  मदत करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी  सोळंके यांनी आपल्या मार्गदर्शनात तरुणांसमोर भविष्यातील आव्हानांचा विचार करता कौशल्य प्रशिक्षणाला विशेष महत्व असल्याचे सांगितले. अनेक देशात व्ययसायिक शिक्षणाला प्राधान्य दिल्याने प्रगती साधल्याचे त्यांनी उदाहरण दिले. वाढत्या लोसंख्येत तरुणांची संख्या लक्षात घेता भविष्यात ज्याच्याकडे कौशल्य आहे तोच टिकणार हे त्यांनी पटवून दिले. आयसीआयसीआय फाउंडेशन ग्रामीण भागात 1 महिन्याचे व्यावसायिक अभ्यासक्रम राबवत आहे ज्या मध्ये प्रामुख्याने प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला आहे. 18 ते 35 वयोगटातील तरुण, तरुणी हे कोर्स करू शकतात. शिक्षणाची अट केवळ आठवी पास इतकी ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर टुल किट भेट देण्यात येणार आहे. या केंद्रात ईलेक्टिकल अँड होम अपलायन्स रिपेअर,  मोबाइल दुरूस्ती, बेसिक वेल्डिंग, ब्युटी पार्लर, गवंडी काम आणि स्टील स्ट्रक्चर, फ्रीज एसी दुरूस्ती, नळ फिटिंग, पंप रिपेअर आणि मोटर रिवायडिंग इत्यादि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जि.प. शाळेचे शिक्षक महादेव घायतिडक व इतर शिक्षक वृंद तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले.  पाहिल्याच दिवशी 30 प्रशिक्षणार्थयांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश काटे यांनी केले. या कार्यक्रमाचेे नियोजन नीलेश राऊत, विश्वास लोमटे, रोहित भांडवले, यांनी केले.

 
Top