तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यात संततधार पाऊस होत असल्याने कांदा पिके धोक्यात आल्याने या नुकसानचे  पंचनामे करुन आर्थीक मदत देण्याची मागणी आमीर इब्राहीम शेख जिल्हाप्रमुख शिव अल्पसंख्याक सेना जिल्हा धाराशिव यांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे.

तुळजापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. कांदा पिकाची लागवड करण्याअगोदर त्याची रोपे तयार करावी लागतात. या वर्षी शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातील कांद्याची रोपे तयार करणासाठी मोठे प्रमाणात बी टाकले. परंतु तालुक्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले बी जमीनीत जिरुन गेले असुन थोडे फार उगवलेले रोपे सुध्दा जिरुन गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे बियाणे खर्च, बैल बारदाना खर्च, सारे (वाफे) तयार करणे खर्च व फवारणी (खते) खर्च असा मोठ्या प्रमाणात खर्च वाया गेलेला आहे. तालुक्यात सततच्या पावसामुळे 80% ते 85% कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झालेले असुन पाहणी करुन कृषी विभाग व तलाठी यांना पंचनामे करण्याबाबत आदेश द्यावेत व या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी ही अशी मागणी केली आहे.

 
Top