तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव पदावर कार्यरत असलेले उमेश आनंदराव भोपळे हे एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एलएलबीच्या परिक्षेत अंतिम वर्षात 65.70 टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणीत उर्तीण झाले. त्यांना प्रा. नितीन कुंभार, प्रा. शहा, प्रा. आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती संतोष बोबडे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा संचालक विजय गंगणे, आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष  विजय निंबाळकर, संचालक अँड. दिपक आलुरे, अँड रामचंद्र ढवळे, अँड. अशिष सोनटक्कृ, रामकृष्ण  बालाजी रोचकरी, संतोष कदम तसेच पञकार संघाचे जिल्हा उपाअध्यक्ष श्रीकांत कदम, कृषी उत्पन्न बाजार समिती लेखापाल शिवानंद राठोड, सह कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, आडत व्यापारी, शेतकरी आदिंनी अभिनंदन केले.

 
Top