भूम (प्रतिनिधी)-गुरु कोणताही असो गुरु तो गुरु असतो, प्रत्येकाने गुरुचा सन्मान केला पाहिजे या भावनेतून भाजप शहर कार्यालयात शैक्षणिक - सामाजिक क्षेत्रातील गुरु आलिम शेख सरांचा सन्मान केला.
रविवार दि 21 जुलै 2024 रोजी गुरु पोर्णिमा यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली . यात भाजप - सेना - कॉग्रेस - अपक्षासह सामाजिक क्षेत्रातील मंडळही मागे नव्हते . अनेकानी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतल्या शिक्षकांचा अवर्जून सन्मान केला.
प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाचा कोणी ना कोणी गुरु असतो, तो वयाने लहान असो की मोठा, ज्याला आपण आयुष्यात सल्ला घेतो, मार्गदर्शन घेतो, तो गुरुच असतो. अशा गुरुचा सन्मान करण शिष्य म्हणून आपलं कर्तव्य आहे. राजा महाराजांच्या, साधू संतांच्याही नव्हे देव देवतांच्याही काळात गुरुधर्म पाळला जात. एकमेकांच्या विचारातून खूप कांही साध्य होत. तस तर प्रत्येकाचे प्रथम दर्जाचे गुरु म्हणजे त्यांचे माता - पिता आहेत. आगोदर यांचा सन्मान करण अत्यावश्यक आहे. प्रत्येक गुरुला निश्चितपणे वाटतं आपला शिष्य चमकदार व्हावा. त्याच्या त्याने निवडलेल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी. शिष्याच्या यशात खरा तो वाटा गुरुचाच असतो. गुरु देखिल शिष्याला घडवण्यासाठी त्याचा अनुभव कौशल्य पणास लावत आसतात.
गुरुच्या मार्गदर्शनाने एखादा शिष्य चमकला, आयुष्यात निवडलेल्या मार्गात यशस्वी झाला तर त्याने देखिल गुरुला विसरता कामा नये. कामापूरता मामा असे होता कामा नये. गुरु हा खरं तर जात, धर्म, पंत, गरिब, श्रीमंत, लहान, मोठा असा भेदभाव कधीच करत नाही, त्यांना सर्वजण सारखेच असतात.
शैक्षणिक क्षेत्रात तर शाळेत प्रत्येक वर्गात विविध जातीचे विद्यार्थी असतात, त्यांना आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम हे शिक्षक गुरु समजून करत असतात , दिशा देण्याचे काम देखील गुरूच्या हातूनच होत असते, प्रत्येक ठिकाणी गुरूला अग्रस्थानी मानले जाते. अशा या गुरूचा आदर सन्मान प्रत्येक वर्षी करून गुरुनानक जयंतीच्या दिवशी केला जातो. त्याप्रमाणे भूम येथे देखील भाजपच्या कार्यालयात बानगंगा शाळेचे क्रीडा शिक्षक - सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेले आलीम शेख सर यांचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, पत्रकार शंकर खामकर, डॉ अशोक दराडे, आनंद जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.