धाराशिव (प्रतिनिधी) - आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने तुळजापूर व उमरगा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव एकमताने दि.23 जुलै रोजी पारित करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा काँग्रेस कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील हे होते. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात उमरगा - लोहारा व तुळजापूर हे दोन मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले असल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा तिरंगा फडकला पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, विश्वास शिंदे, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, विजयकुमार सोनवणे, मुकुंद डोंगरे, काका सोनटक्के, अग्निवेश शिंदे, ॲड विलास राजोळे, नवाब काझी, विलास शाळू, महेबुब पटेल, उमेश राजे, नवाज काझी, विनोद वीर, प्रकाश चव्हाण, सिद्धार्थ बनसोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मानले.