परंडा (प्रतिनिधी) - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष  बिभिषण खुणे यांचा वाढदिवस बुधवार दि .10 जुलै रोजी सामाजिक उपक्रामाने साजरा करण्यात आला आहे.

वाढदिवसा वर होणारा अनावश्यक खर्च एखादया सत्कर्मावर लावन्याची भावणा परंडा तालूक्यात वाढताना  दिसत आहे.गोर गरीब मुलांच्या चेहऱ्यावर चे एक हास्य सर्वात मोठा आनंद देणारा क्षण असतो या साठी शाळेतील मुला सोबत वाढदिवस साजरा करण्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभिषण  खुणे यांनी घेतला व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे व कार्यकर्ते सह बुधवार दि .10 जुलै रोजी  परंडा येथिल जमियतूल सुफी ए  हिंद या शाळेतील  मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला जामियतूल  शाळेत आरबी , सह हिंदी मराठी , इंग्रजी विषय शिकवीले जाते. या शाळेत गरीब विद्यार्थी असल्याने त्यांना  वहया,पेन व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, दयानंद बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गणी हावरे, खय्यूम तुटके, ॲड.दयानंद धेंडे, शाळेचे संस्थापक सुनिल पाटील, सचिव वाहेद शेख, भाऊसाहेब ओहाळ, पैलवान भारत पवार, पैलवान भारत जाधव व संस्थेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

 
Top