नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या ऊसाचे बील द्यावे. अन्यथा शेतकऱ्यांसह कारखान्यावर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी दिला आहे.

 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यात आपला ऊस घातला आहे. मात्र सात महिने झाले तरी कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचे बील दिले नाही. त्यामुळे या कारखान्यात ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला आहे ते शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकदा शेतकरी बिलासाठी कारखान्यावर हेलपाटे घालत आहेत. मात्र कारखान्याकडुन त्यांना आश्वासनाशिवाय दुसरे कांही मिळालेच नाही असे अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता कारखान्याने निदान पेरणीच्या वेळी तरी या शेतकऱ्यांना पैसे देणे गरजेचे होते. कांही शेतकऱ्यांच्या घरी कार्यक्रम होते. त्याही वेळी कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. 

 
Top