धाराशिव (प्रतिनिधी)- लिंक्डइन हे एक वेब पोर्टल असुन वाणिज्य क्षेत्र, उद्योगधंद्यांमधील व्यावसायिक भेटीगाठीं यासाठी ते प्रामुख्याने ओळखले जाते. फेसबुकवर ज्याप्रमाणे मित्रांची यादी असते, तीच यादी लिंक्डइन येथे देखील असते त्याला कनेक्शन्स असे संबोधले जाते. इतर सोशल नेटववर्किंग साईट प्रमाणे यात देखील व्हिडीओ शेअरिंग, फोटो शेअरिंग, म्युझिक शेअरिंग, ब्लॉगिंग, मायक्रोब्लॉगिंग अश्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र फक्त व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी वापर केले जाणारे लिंक्डइन हे एकमात्र संकेतस्थळ आहे. व्यावसायिक जगतात लिंक्डइन ह्य़ा संकेतस्थळवर माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे ठरते. लिंक्डइनवरची प्रोफाइल म्हणजे एक व्यावसायिक रेझ्युमे किंवा बायोडेटा मानला जातो. 

लिंक्डइनवरची प्रोफाइलचा उद्देश म्हणजे नोकरी किंवा उद्योगसाठीचा संपर्क वाढवणे. त्यातून रोजगारप्राप्ती करणे, नफा मिळवणे. त्यामुळे वापरकर्त्याला शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती इथे अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. लिंक्डइनमध्ये जवळ जवळ सर्वच व्यावसायिक एकत्र येऊन एकमेकांशी संपर्क साधत असतात. यामध्ये जर एखाद्या व्यावसायिकाला काम करण्यासाठी काही लोकांची गरज असेल तर लगेच त्या जॉब्स संदर्भात लिंक्डइन मध्ये पोस्ट तयार करतात आणि ज्या व्यक्तीला कामाची किंवा नोकरीची आवश्यकता असते तो व्यक्ती हि पोस्ट पाहून जॉबसाठी अर्ज सुद्धा करू शकतात.

या व्यतिरिक्त लिंक्डइन विद्यार्थीसाठी त्यांचे स्किल सेट वाढवण्यासाठी टेक्निकल प्रशिक्षण देत आहे त्यामध्ये टॅबलेऊ ,एसक्यूल , पॉवर बीआय ,सायबर सेक्युरिटी, आर्टीफिसिअल इंटेलिजिएन्स,पायथन, जावा स्क्रिप्ट, सॅप, इआरपी  इत्यादी अनेक महत्वाचे जॉबसाठी लागणारे गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. 

त्यानुसार फेस अँप आणि लिंक्डइन यांच्या संयुक्त विद्यमानाने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिनांक 27 जुन आणि 28 जुन रोजी लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्किंगचे  “लिंक्डइन करिअर स्टार्ट प्रोग्रॅम 2024“  च्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी हैदराबादहुन आलेल्या मिस म्याकल कीर्थणा आणि मिस जिंका अमूल्य यांनी विद्याथ्यांना लिंक्डइनवर प्रोफाइल कसा तयार करावा, त्याचा वापर कसा करावा. टेक्निकल स्किल सेट वाढवण्यासाठी लिंक्डइन चा कसा उपयोग करावा त्याचबरोबर इंटर्नशिप आणि नौकरी कशी शोधावी. रेझुमे कसा बनवावा, इंटरव्हिएवची तयारी कशी करावी. या विषयाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तब्बल नऊशे विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने हे प्रशिक्षण घेतले. त्याच बरोबर महाविद्यालयाच्या हजारो प्रशिक्षणार्थी सहा महिण्यासाठी  प्रीमियम अकाउंट फ्री मध्ये देण्यात आले. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थीना त्याचा मोफत फायदा मिळेल.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यावेळी मनोगत व्यक्त केले असता म्हणाले कि, अशा प्रकारचे लिंक्डइन करिअर स्टार्ट प्रोग्रॅम 2024 आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घडवून आणण्यासाठी महाविद्यालय मागील वर्षापासून प्रयत्नशील होते. या प्रोग्रॅममुळे विद्यार्थ्यांच्या स्किल सेट मध्ये नक्कीच वाढ होऊन प्लेसमेंट संख्येबरोबर पॅकेज मध्येही येणाऱ्या काळात चांगली वाढ होणार आहे व त्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे. त्यांनाही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्म वर सर्व गोष्टी मोफत मिळणार आहेत. जॉब साठी लागणारे स्किल सेट आणि नौकरीचा शोध एकाच प्लॅटफॉर्म मिळणार आहे. त्याचा विद्यार्थीयांनी फायदा घ्यावा. “ विद्यार्थ्यांना चांगले चांगले सुविधा देण्यासाठी आमचे महाविद्यालय नेहमी अग्रेसर असते. त्यामुळे चालू वर्षामध्ये महाविद्यालयातील 49 विद्यार्थ्यांना पाच लाखाहून अधिक रक्कमेचे गुगल कंपनीचे सर्टिफिकेशन व्हाउचर व महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थिनींना लॅपटॉप व प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष एक लाखाहून अधिक कमिंस इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने मिळणारी न्यूटरींग ब्रिलियर्स शिष्यवृत्ती मिळाली आहे याचा मला अभिमान आहे.

तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त मल्हार पाटील आणि महाविद्यलयाचे समन्व्यक गणेश भातलवंडे  यांनी प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे अभिनंदन केले.

 
Top