धाराशिव (प्रतिनिधी)-राज्य सरकारने आज सादर केलेला फुगीर अर्थसंकल्प म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे. परंतु मागील अडीच वर्षात सत्ताधारी महायुतीच्या सरकारला जनतेने चांगलेच ओळखले आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांमधून दिसून आलेला आहे. आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला, शेतकरी, सामान्य वर्ग, नोकरदारांना खूष करण्यासाठी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या तरतुदींचा प्रत्यक्ष लाभ सामान्यांना जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा अर्थसंकल्प विश्वासास पात्र ठरत नाही. नाकर्ते सरकार जनतेसाठी आणि विकासासाठी काहीच करणारे नाही. शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा आणि कृषीविषयक योजना प्रत्यक्षरित्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही. रोजगारनिर्मितीचे नेमके धोरणही या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत नाही. आधार किंवा मदतीच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत. परंतु या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, हा या सरकारचा अनुभव आहेत. नुसते आकडे जाहीर करून काय साध्य होणार? अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर यांनी दिली.

 
Top