तुळजापूर (प्रतिनिधी) - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एक  महिना होऊनही श्री तुळजाभवानी देवालयात झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हे नोंद न केल्याच्या निषेधार्थ शनिवार दि 15 रोजी .हिंदू जनजागृण समितीने मंदीर समोर घटानांद आंदोलन केले. यावेळी सरकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करुन सोने चांदी अपहार प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन समितने दिला.

श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात नऊ लिलावदार सहा तहसीलदार, एक लेखाधिकारी धार्मिक व्यवस्थापक  सरकारी अधिकारी गुंतले आहेत. म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने रद्दबातल ठरवला आहे. तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदी 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे

आदेश दिले आहेत. या संदर्भात न्यायालयाने 10 मे या दिवशी आदेश देऊन 1 महिना उलटला तरीही गुन्हे नोंद झालेले नाहीत. तसेच या संदर्भात पत्रकार परिषद घेऊनही प्रशासन कृती करण्यास सिद्ध नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री तुळजाभवानी देवालयात झालेल्या अपहार प्रकरणी कालमर्यादा ठरवून तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत. या प्रकरणी दिनांक 22/09/2017 च्या चौकशी क्रमांक 10/2012 या अहवालाप्रमाणे न्यायालयाने सुचवलेल्या शिफारसीचे तंतोतंत पालन करावे.

या निवेदनावर सुनील घनवट, किशोर गंगणे यांच्या स्वाक्षरी आहेत. यात राजन गणगे, किशोर गंगणे, सर्वौत्तम जेवळीकर, विजय भोसले, विशाल टोले, गणेश मांडरे, निखील मांडरे, भाग्यश्री जाधव, सागर कालेकर, अर्जुन सांळुके सह हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

 
Top