धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी परीक्षेत 90% टक्क्याहुन अधिक गुण घेणारे विद्यार्थी आहेत हे या जिल्हा परिषदेच्या शाळेने सिध्द केले आहे. ही अत्यंत कौतुकाची व अभिमानाची बाब आहे यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध होते. जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते त्यामुळे ग्रामीण भागातील  पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे असल्याचे मत  धाराशिव  जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन इगे यांनी  तालुक्यातील वडगाव (सि) येथील जि. प. प्रशालेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वाटप  प्रसंगी व्यक्त केले. 

प्रारंभी आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप व वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी  सरपंच बळीराम कांबळे,  उपसरपंच जयराम मोरे,  युवा नेते अंकुश काका मोरे,  शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील,  उपाध्यक्ष अभिमान वाडकर ,सहा.लेखाधिकारी शरद माळी, मुख्याध्यापक व्ही. एच.नाईकवाडे,  शालेय समितीच्या सौ.राणी राजेंद्र जानराव यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची व शाळा परिसराची पाहणी करून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता व दहावीच्या परीक्षेतील निकालाचे व शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्याचे आवहान केले.  यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती ज्योती राऊत, सरोजा पाटील,  सुचिता शेलार, निर्मला गुरव, रजनी रावळे, भूषण मदने आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top