धाराशिव (प्रतिनिधी)- जाधववाडी रोड येथील फ्लाईंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूल, धाराशिव येथे जागतिक योग दिन व जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वर्गानी देखील बहुसंख्येने सहभागी होऊन विविध योगा प्रकार सादर केले. प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी योग, संगीताचे महत्त्व सांगत दररोज योगा करा व मानसिक शांततेसाठी संगीत श्रवण करा म्हणत सर्वांना संबोधित केले. त्याचप्रमाणे योगा आणि संगीत याचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या होणारे फायदे आणि निरोगी आरोग्याचा मंत्र देखील प्राचार्य चतुर्वेदी सरांनी सर्वांना दिला. 

कला शिक्षक जगदीश सुतार यांनी योगा आणि संगीत यांचे महत्व सांगत विविध योगा प्रकार सादर करत सर्वांना मार्गदर्शन केले. सोबतच सर्वांनी योगासन करण्याचा आनंद लुटला. याक्षणी विशेष प्राणायामाचे विविध प्रकारांची माहिती देत त्याचे मानवी जीवनातील महत्त्व सुद्धा कला शिक्षक सुतार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जागतिक संगीत दिनानिमित्त भारतीय संगीत कलेबद्दल माहिती देत कला शिक्षक सुतार यांनी  बासरी वादन करून सर्वांना प्रफुल्लित केले. 

जागतिक योगा व संगीत दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फ्लाईंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूल, आयोजित ऑनलाईन पोस्टर मेकिंग स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ देखील करण्यात आले. सदरील ऑनलाईन स्पर्धेत तब्बल 130 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. फ्लाइंग किड्स शाळेतील मोठया गटात प्रथम क्रमांक आरोही पेंदे (6 वी) हिने मोठ्या गटातून  मिळवला आहे. तसेच लहान गटातून द्वितीय क्रमांक प्रणया पेंदे, तृतीय क्रमांक विनायक घोने यांनी यश संपादित केले आहे. प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रथम 1100, द्वितीय 500, तृतीय 250 अशी रोख रक्कम व अधिकृत प्रशस्तिपत्रक  देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच उर्वरित बाहेरगावाहून विजेते विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यामातून व पोस्टद्वारे बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले.

 
Top