धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक श्रद्धानंद माने- पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विजयसिंह माने- पाटील (वय 85) यांचे आज, शनिवारी (दि.22) दुपारी 12.30 वाजता दिर्घ आजाराने निधन झाले आहे. गत काही दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या मुळच्या तुगाव (ता.उमरगा,जि.धाराशिव) येथील रहिवाशी होत्या.  त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी 5 वाजता धाराशिव शहराजवळील कपीलधारा स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे.

 
Top