तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यास शनिवार (दि.8)  रोजी मृग नक्षत्राच्या पाऊन तास मुसळधार पावसाने  झोडपून काढले. या झालेल्या पावसामुळे  ग्रामीण भागात शेतकरी  वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे खरीप पेरण्या वेळेवर होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली असुन शेतकरी वर्ग काळ्या आईची ओटी भरण्याचा तयारीस लागला आहे.

रविवार पासुन कृषी केंद्रावर खते बिबियाणे खरेदी साठी शेतकरी गर्दी करण्याची शक्यता आहे. या झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील थांबलेले अर्थचक्र चालु होणार आहे. शनिवारी साडेचारला पावसास आरंभ झाला. तो मध्यम स्वरुपाचा होता. सांयकाळी सहा वाजता सुमारे पाऊण तास जोरदार कोसळळा. हा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याचे वृत्त आहे. या झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची असाह्य उष्णतेपासुन सुटका झाली.

शनिवारी दुपारी मृग नक्षञाच्या पावसात मुलांनी पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला. तर बळीराजांने पावसाचे स्वागत करुन समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी लांबणारा पाऊस यंदाच्या वेळेत दाखल झाला असून मृगाच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार एन्ट्री केल्याने खरीपाच्या मशागतीला वेळ मिळणार आहे. तुळजापूर परिसरात. शनिवारी  सांयकाळच्या सुमारास काळे ढग भरून आल्यानंतर चार वाजेपासनच दमदार पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या होत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग काळ्या आईची ओटीभरण्यासाठी खरीप पेरणी साठी तयारीत गुंतला आहे. एकंदरीत मृगनक्षञाचा पावसाने सर्वञ आनंद उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

 
Top