कळंब (प्रतिनिधी)- धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने शहरातील छत्रपती संभाजीराजे नगर मधील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात राज्याभिषेक दिनानिमित्त दि.6 जून 2024 रोजी वार गुरुवारी राजमाता जिजाऊ माँसाहेब व कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.   याप्रसंगी निदेशक अविनाश म्हेत्रे, प्रा.सागर पालके, आदित्य गायकवाड, प्रा.मोहिनी शिंदे, निदेशिका कोमल मगर व वेद शैक्षणिक संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांची व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.

 
Top