तुळजापूर (प्रतिनिधी) -यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील मातब्बर नेत्यांच्या गावातही विरोधकांना बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. भाजप हा एकनिष्ट कार्यकर्त्यांचा पक्ष मानला जातो. भाजपची बुथ पातळीवर यंञणा सक्षम असताना भाजपचे घटलेले मतदान हे चिंताजनक आहे.

उलट महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षात झालेली फुट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्ष कार्यकर्ते फळी तितकेशी ताकदवान नसताना महाविकास आघाडीच्या खा. ओमराजेना मिळालेले मताधिक्य भाजपला विचारमंथन करावे लागणारे ठरले आहे. 

 
Top