तुळजापूर  (प्रतिनिधी)- शिक्षण पार पडल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करणे आणि त्यासोबतच नवनवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा वापर आपल्या शेती तसेच व्यवसायात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन युवा व्याखाता गणेश शिंदे यांनी लोकमंगल फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी रोहन देशमुख होते.

यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना  गणेश शिंदे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी भविष्यात करिअर निवडताना काय काळजी घेतली पाहिजे आणि पुढील वाटचाल सक्षम करण्यासाठी कोणत्या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे या संदर्भातील सर्व बाबी सरांनी विविध दाखल्यासह सांगितल्या. आपल्या यशाचे खरे वाटेकरी हे आपले पालक असून त्यांची मान नेहमी उंचवत राहील असेच कार्य आपल्या हातून घडत राहावे अशी देखील त्यांनी अपेक्षा विद्यार्थ्याकडून व्यक्त केली. पालकांनी देखील विशेष करून आपल्या मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण देऊन तिला स्वावलंबी बनण्याची संधी  नक्कीच द्यावी अशी रास्त मागणी सुद्धा त्यांनी केली. बदलत जाणाऱ्या युगाबरोबर आपण देखील बदलाचा भाग घडला पाहिजे अन्यथा आपण समूहाच्या बाहेर फेकले जाऊ याची जाणीव सुद्धा त्यांनी विविध उदाहरणाद्वारे करून दिली.     

अध्यक्षीय मनोगतामध्ये रोहन देशमुख म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच उत्तुंग ध्येय गाठावे अशी आशा व्यक्त केली. ग्रामीण भागातून येऊन फक्त छोट्याश्या व्यापाराच्या जोरावर सोयाबीन मिल उभारणी करणाऱ्या उद्योजक शाम पाटील यांचा दाखला देऊन विद्यार्थ्यांनी इच्छाशक्तीचा जोरावर आकाशाला गवसनी घालता येऊ शकते हे त्यांनी सांगितले. लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल शैक्षणिक समूह नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी गौरवाने सांगितलं. लोकमंगल समूहाचे संस्थापक सुभाष देशमुख यांची उद्योजक घडवण्याची संकल्पना सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नक्कीच एक यशाचा पल्ला गाठेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यानंतर तुळजापूर व आसपासच्या परिसरातून आलेल्या  इयत्ता 10 वी उत्तीर्ण 210 व 12 वी उत्तीर्ण 104 विद्यार्थी विद्यार्थिनी चा सहभाग होता. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू सत्कार केला.

प्रारंभी प्रास्तविक डाँ अनिता ढोबळेयांनी केलेतर  सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील प्रा. गौतम जाधव आणि  लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्रा. अजित कुरे यांनी उत्तमरीत्या बजावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकमंगल फाउंडेशन, लोकमंगल मल्टीस्टेट, लोकमंगल बँक, लोकमंगल शैक्षणिक समूह या सर्वांचे सहकार्य लाभले.  कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी लोकमंगल समूहातील सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजन व संपन्नते करिता रामदास कोळगे, विजय शिंगाडे ,साहेबराव घुगे,प्रभाकर मुळे,बालाजी शिंदे, सचिन आडगळे, श्याम पाटील, बाबा बेटकर,अनिल जाधव,महादेव सालगे, गुणवंत कोनाळे, नागेश चौगुले, मकरंद लबडे, गजानन वडणे, सुदर्शन जाधव, येहरार काजी, श्याम गाटे, ज्ञानेश्वर जमदाडे, लिंबराज साळुंके, भास्कर बोंदर, तसेच तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे सर्व कार्यकर्ते इत्यादींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी तुळजापूर तालुक्यातील विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सत्कार सोहळ्यानंतर सर्व उपस्थितांनी भोजनाच्या आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top